विवाहितेकडे 50 लाख रुपयांची मागणी : चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी l प्रतिनिधी
फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार जुलै 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पिंपरी आणि पिंपळे सौदागर येथे घडली.
पती राजेश बबन सहाणे, सासू छाया बबन सहाणे, सासरे बबन गंगाधर सहाणे, दीर निलेश बबन सहाणे (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी फिर्यादी विवाहितेला वेळोवेळी ‘तुला स्वयंपाक नीट करता येत नाही. तू काय कामाची नाही. त अडाणी आहे’ असे बोलून विवाहितेचे 11 तोळे सोन्याचे दागिने स्वतःकडे घेतले. फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची सतत मागणी केली. घरगुती कारणांवरून विवाहितेला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.