पिंपरी / चिंचवड

कुदळवाडी येथील पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना बेंच पुरविण्याची मागणी

स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची शिक्षण मंडळाला निवेदन

पिंपरी l प्रतिनिधी

कुदळवाडी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा क्रमांक 89 मध्ये मुलांना बसण्यासाठी बेंच नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाने विद्यार्थ्यांना बेंच पाठवून द्यावेत, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाचे उप आयुक्त यांना निवेदन दिले आहे.

कोरोनाचा कहर कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळा देखील सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये विविध पद्धतींनी स्वागत केले जात आहे. कुदळवाडी येथील महापालिका शाळा क्रमांक 89 देखील सुरु झाली आहे. विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी बेंच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

शिक्षण मंडळ अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून तात्काळ शाळेत विद्यार्थ्यांसाठी बेंच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button