breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडीत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाची मागणी

  • स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची अर्थसंकल्पासाठी सूचना
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद

पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाख रुपयांपर्यंतची कामे सुचविण्याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी कुदळवाडी येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

नगरसेवक दिनेश यादव यांनी फ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांना याबाबत पत्र दिले. कुदळवाडीतील अण्णासाहेब मगर बँक ते प्रथमेश पार्क सोसायटी पर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकावी. या कामासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर परिसरातील नागरिकांचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

आगामी आर्थिक वर्ष 2021 22 च्या अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी त्यांच्या सूचना पालिकेला द्याव्यात. आपल्या परिसरात अपेक्षित असणारी दहा लाख रुपयांपर्यंतची कामे नागरिकांनी सुचवावित असे आयुक्तांनी सांगितले होते. यातून अर्थसंकल्पामध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पालिकेने सूचना मागवल्या आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सूचना नागरिकांना करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button