पिंपरी / चिंचवड

ऑनलाईन माध्यमातून पाठलाग करत दोन महिलांची बदनामी

पिंपरी l प्रतिनिधी

एका अनोळखी व्यक्तीने दोन महिलांचा ऑनलाईन माध्यमातून पाठलाग केला. महिलांचे फोटो आणि चित्रफीत अपलोड करून त्यांची बदनामी केली. हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते 24 मे 2022 या कालावधीत च-होली बुद्रुक येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या खोट्या मेल आयडी तयार करून त्यावरून फिर्यादी महिलेचा त्याने पाठलाग केला. फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीचे फोटो आणि चलचित्र अपलोड करून त्याखाली अश्लील मेसेज लिहून ते नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हायरल केले. फिर्यादी यांच्या बद्दलची चुकीची माहिती तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button