पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक कमेंट करणाऱ्या पंधरा जणांवर पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 294, 500, 501, 504, 505 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश वर्तक, विश्वजीत इंद्रदेव पोटफाडे, विपुल भोंगळे, विनोद पवार, विजय भुंगे, रजनीकांत राठोड, शंतनू घनवट, प्रसन्ना निजामपूरकर, आशुतोष पठाडे, हरीश शेटे, कुणाल महाडीक, गणेश चोरमारे, अभिजीत देशमुख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नितीन संजय यादव यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील करंजीपूर या गावात राहणाऱ्या काही व्यक्तींनी द काश्मीर प्राईस हा चित्रपट करमुक्त करावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फेसबुक पोस्ट वर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक कमेंट लिहिल्या होत्या. ज्यांनी ज्यांनी या कमेंट केल्या आहेत त्या सर्व विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.