पिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

मैत्रिणीचा निवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ मित्र मैत्रिणींना पाठवून बदनामी

पिंपरी l  प्रतिनिधी

मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करून तिला निवस्त्र होण्यास सांगून तिचा व्हिडीओ काढून तो मित्र मैत्रिणींना सोशल मीडियावर पाठवून मैत्रिणीची बदनामी केली. याप्रकरणी मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नवी सांगवी येथे घडला.

याबाबत पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माढा तालुक्यातील एका 27 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी आणि आरोपी हे मित्र आहेत. आरोपीने सप्टेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत फिर्यादीला व्हाट्सअपवर व्हिडीओ कॉल केला. कॉल सुरु असताना त्याने तरुणीला निवस्त्र होण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीचा निवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ आरोपीना शूट केला. तो व्हिडीओ आरोपीने फिर्यादीच्या मित्र मैत्रिणींना व्हाट्सअपवर पाठवला.

विडिओ व्हायरल करून तरुणीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button