TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमुंबईराजकारणराष्ट्रिय

देवकीनंदन ठाकूर महाराज यांना जीवे मारण्याची धमकी

खारघरः आध्यात्मिक गुरू देवकीनंदन ठाकूर महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परदेशातून गुरु देवकीनंदन ठाकूर महाराज यांना धमकी आली असून, याप्रकरणी खारघर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आध्यात्मिक गुरू देवकीनंदन ठाकूर महाराज यांना दुबईहून जीवे मारण्याची धमकी फोन आला होता. देवकीनंदन ठाकूर महाराज यांचे खारघर येथील सेंट्रल पार्क येथे २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यानच सदर प्रकार घडला आहे. परदेशातून आलेल्या या फोनवरून देवकीनंदन महाराज यांना शिवीगाळ करत मुस्लिम समुदायाविरुद्ध बोलण्यापासून परावृत्त केले आहे.

“दुबईहून धमकीचा फोन आला होता, ज्यामध्ये त्यांना मुस्लिमांविरुद्ध न बोलण्यास सांगितले होते. तसेच, जर त्यांनी सल्ल्याचे पालन केले नाही तर त्यांना ठार मारले जाईल”, असे या फोन वरून सांगितल्याची माहिती देवकीनंदन महाराज यांनी दिली. दरम्यान, या धमकीच्या फोननंतर खारघर पोलिसांनी देवकीनंदन महाराज यांच्या सुरक्षेत वाढ करून संबंधित धमकीच्या फोनसंदर्भात अधिक तपास सुरु केला आहे.

देवकीनंदन ठाकूर कोण आहेत?
देवकीनंदन ठाकूर हे हिंदू पुराण कथाकार, गायक आणि आध्यात्मिक शिक्षक आहेत. 1997 पासून ते श्रीमद भागवत कथा, श्री राम कथा, देवी भागवत, शिव कथा, भागवत गीता इत्यादींवर प्रवचन देत आहेत. 2015 मध्ये त्यांना यूपी रतन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवकीनंदन ठाकूर यांचा जन्म 12 सप्टेंबर 1978 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा येथील ओहावा गावात झाला. असे म्हणतात की वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि वृंदावन गाठले आणि ब्रजच्या रासलीला संस्थानात हजेरी लावली. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी श्रीमद भागवत पुराण कथन केल्याचे सांगितले जाते. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी श्री राम मंदिर, दिल्ली येथे लोकांना श्रीमद भागवत महापुराणाचा उपदेश केला. त्यांनी आतापर्यंत हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे आणि हॉलंड यांसारख्या ठिकाणी त्यांच्या कथा सांगितल्या आहेत.

जगात शांततेसाठी त्यांनी सेवा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्यांच्या विश्वशांती सेवा चॅरिटेबल ट्रस्टचा उद्देश सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या या प्रदेशातील आनंद कायम ठेवण्याचा आहे. श्री ब्राह्मण महासंघाने परमपूज्य श्री देवकीनंदन ठाकुरजी महाराज यांना आचार्येंद्र ही पदवी देऊन सन्मानित केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button