पिंपरी / चिंचवड

डॉक्टरच्या मनमानी उपचारामुळे महिला रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

न्यूमोनिया झालेल्या महिला रुग्णावर योग्य उपचार न करता मनमानी पद्धतीने उपचार केले. यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 ते 3 सप्टेंबर 2018 या कालावधीत जगताप डेअरी येथील लाईफलाईन क्लिनिकमध्ये घडला.

संतोष तुकाराम भागवत (वय 48, रा.  विशाल नगर, जगताप डेअरी, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. प्रदीप एच पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीला (वय 43) न्यूमोनिया झाला. त्यांना डॉ. प्रदीप पाटील यांच्या लाईफलाईन क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी योग्य प्रकारे निदान केले नाही. निष्काळजीपणाने फक्त रक्ताच्या तपासण्या करून प्लेटलेट्स कमी झाल्याचा निष्कर्ष काढून मनाला वाटेल तसे उपचार केले.

त्यानंतर 4 सप्टेंबर 2018 रोजी फिर्यादी यांच्या पत्नीची प्रकृती जास्त बिघडली. त्यामुळे त्यांनी पत्नीला पुढील उपचारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल, थेरगाव येथे नेले. मात्र उपचारादरम्यान 5 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.

फिर्यादी यांच्या पत्नीचा मृत्यू डॉ. प्रदीप एच पाटील यांनी केलेल्या हायगयी आणि निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button