breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कर्णबधिर स्पर्धकांनी दांडियाचा धरला ताल!

  • आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे पिंपरी-चिंचवड येथे आयोजन

पिंपरी प्रतिनिधी

संगीताच्या तालावर आपल्या सर्वांचीच पावले थिरकायला लागतात. परंतु ऐकू व बोलू न शकता येणारे स्पर्धक फक्त हाताच्या इशाऱ्यावर अत्यंत तालबद्ध पद्धतीने ठेका धरून सुंदर गरबा खेळत होते. आणि हे दृश्य पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या अक्षरशः रोमांच उपस्थित झाले होते.

पिंपरी चिंचवड कर्ण-बधिर असोसिएशनच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित दांडिया स्पर्धेचे. कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीचे अध्यक्ष ला. प्रमोद भोंडे, खजिनदार ला. प्रशांत तेलंगे, सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी , पिंपरी चिंचवड कर्ण-बधिर असोसिएशनचे चेअरमन परशुराम बसवा , अध्यक्ष विलास मोरे, प्रशांत काटे, गणेश कानपिळे , जावेद सय्यद , विकास गवारे , श्रीधर धोंगडी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दांडिया स्पर्धेसोबतच लकी ड्रॉ व विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. ऐकू व बोलू न शकता येणारी राज्यभरातून गोळा झालेले असंख्य स्पर्धक फक्त हाताच्या इशाऱ्यावर अत्यंत तालबद्ध पद्धतीने ठेका धरून सुंदर गरबा खेळत होते. लकी ड्रॉ व बक्षिस समारंभ देताना स्पर्धकांचा चेहऱ्यावर मात्र जग जिंकल्याचा आनंद होता. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते.

धडधाकट असूनही आपण संकट समयी निराश होऊन जातो. परंतु निसर्गाने श्रवण शक्ति व वाचिक शक्ति हिरावून घेऊनही जगण्याचा पुरेपूर आनंद निरागस पणे लुटताना पाहून येथे उपस्थित प्रत्येक जण एक नवीन अनुभव गाठीशी घेऊन परतला असणार याची आम्हाला खात्री आहे.

परशुराम बसवा
चेअरमन
पिंपरी चिंचवड कर्ण-बधिर असोसिएशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button