Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

बँकांचे दिवसभर सर्व्हर डाउन; खातेधारक, करदात्यांना झाली अडचण

 नागपूर | प्रतिनिधी

आर्थिक वर्षाच्या अंतिम दिवशी काही तास बँकांचे सर्व्हर डाउन झाल्याने आर्थिक व्यवहार कोलमडले होते. त्यामुळे खातेधारक आणि करदात्यांची चिंता वाढली होती. सायंकाळी सहा वाजतादरम्यान सर्व्हर पूर्ववत झाल्याने बँकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत झालेत.

आर्थिक वर्ष २०२१-२२ संपले असून आजपासून नवीन आर्थिक वर्ष लागले आहे. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नेहमीच बँकांसाठी महत्त्वाचा असतो. बँक तसेच प्राप्तीकराशी निगडीत आर्थिक प्रकरणे पूर्ण करण्याची अंतिम संधी या दिवशी असते. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच बँकांमध्ये गर्दी होती. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांमध्ये सर्व्हर डाउनची समस्या उद्भवली. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ही समस्या कायम होती. कर भरण्यासाठी आलेल्यांना कागदपत्रे जमा करून देण्यास सांगत सर्व्हर सुरू होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार, अनेकांनी कागदपत्रे विश्वासाने सोपवून घरचा मार्ग धरला. तर काहींनी मात्र विलंबाने कर भरणा करावा लागण्याची खंत व्यक्त केली. यापैकी काहींनी ‘मटा’शी संपर्क साधत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रामदासपेठ आणि किंग्जवे येथील शाखेमध्ये सर्व्हर डाउनचा प्रश्न सायंकाळपर्यंत असल्याची माहिती दिली.

सलग तीन दिवस सुटी

नुकताच २८ आणि २९ असा दोनदिवसीय संप झाला. त्यामुळे बँका बंद होत्या. या दोन्ही दिवसांत बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणाम प्रभावित झाले. त्यानंतर आज १ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेसह सर्व बँकांना सुटी आहे. तसेच शनिवारी गुढीपाडवा आणि ३ एप्रिलला रविवारची सुटी आहे. असे सलग तीन दिवस सुटी आल्याने बँकेशी संबंधित ज्यांचे काम गुरुवारी झालेले नाही, त्यांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button