ताज्या घडामोडीपुणे

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ ; धनकवडी परिसरात

पुणे | शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना पहायला मिळत आहे. स्थानिक गुंड राजरोसपणे हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. बालाजीनगर धनकवडी परिसरात रजनी कॉर्नर येथे फुकट भाजी दिली नाही म्हणून गुंडांनी संबंधित तरुणाला मारहाण केली. पाया पडायला लावले. तसेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.

याशिवाय त्याच ठिकाणी रायडिंग करत दुचाकीस्वारांवर हल्ले केले जात आहेत. या सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून पोलिसांचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे पहायला मिळत आहे. एका अल्पवयीन मुलाला पाया पडायला लावणे, असे व्हिडिओ समोर येत आहेत. धारदार हत्यारे झळकावणे, लोकांना, लहान मुलांना त्रास देणे, रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची आणि महिलांचे छेडछाड करणे, असे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे.

याबाबत परिसरातील नागरिकांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे पहायला मिळत आहे. अशा घटनांमुळे गुंडागिरी तरुणांमध्ये पोलिसांची भीतीही उरलेली नाही. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना छेडणे, हत्यार दाखवणे धमकी देणे हे राजरोसपणे सुरू आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांसह सहकारनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र पोलिसांकडून गुंडांवर कुठलीही कारवाई होत नाही आणि नागरिकांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही.

पोलिसांनीच बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. एवढचं नाही, तर पोलीसच दहशतीत असल्याचं बोललं जातंय. गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. तुम्ही तिथे राहू नका?, असे सहकारनगर पोलीस स्टेशन आणि धनकवडी पोलीस चौकीतून नागरिकांना सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांवर देखील आता या गुंडांची दहशत बसली आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button