ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात दत्त जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा

पुणे | मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंतीच्या तिथीला महालक्ष्मी मातेने सूर्यवंशी सम्राट, युगप्रवर्तक श्री अग्रसेन महाराज आणि नागकन्या माता माधवी यांना युगानुयुगे सम्पन्नता आणि समृद्धीचे आशीर्वाद देऊन समस्त अग्रकुलास वरदान दिला. या वरदान महोत्सवाचे आयोजन पुण्यात अग्रसैनिक- सुधीरकुमार अग्रवाल यांच्या संकल्पने नुसार 2018 पासून दरवर्षी पुण्यातील महालक्ष्मी मंदिरात थाटा-माठात साजरे केले जातो. यंदा हा उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला.पेशवेंनी स्थापन केलेल्या सारसबाग मंदिरात गणेश पूजन आणि आरती करून, बँड-बाजा, ध्वजाच्या गजरात महालक्ष्मी मंदिरात पोहोचून फुलांची भव्य रांगोळी आणि सर्व महिलांनी 108 देशी तुपाचे दिव्यांच्या चमचमीत प्रकाशात आईच्या दरबारात गरबा केला. महालक्ष्मी मंदिरात कलश यात्रा आणि उपस्थित सर्व अग्रवाल बंधू-भगिनींचे भव्य स्वागत आणि पंडितजीं द्वारे आशीर्वाचन तसेच “श्री अग्रसेन महाराज की जय”, “माता माधवी की जय”, “लक्ष्मी माता की जय” “हर हर महादेव”, नंतर “श्री गुरुदेव दत्त” यांचा जोरदार जय जयकार केला असे अग्रवाल समाज फेडरेशन-पुणे चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.

गरमागरम चहा-नाश्त्यासोबत, खिरांत आणि डिंक लाडूंचा प्रसाद वाटून, सर्वांच्या तन, मन, धनाच्या सहकार्याने हा वरदान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला असे महिला समितीच्या अध्यक्षा- श्रीमती नीता अग्रवाल आणि सरस्वती गोयल यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेशजी जालान, वेद रामरतन गुप्ता, उत्तमचंद अजयचंद अग्रवाल, जी.डी.अग्रवाल, विशाल अग्रवाल, उषाजी तुलश्यान, मीना गोयल आदिंनी अग्रसैनिक-सुधीरकुमार अगरवाल यांना मदत केली असे रेशमजी अगरवाल आणि अनिलकुमार अगरवाल यांनी सांगितले .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button