पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडच्या स्वयंघोषित भाईची थेरगावात दादागिरी

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवडचा भाई असल्याचे म्हणत एका स्वयंघोषित भाईने त्याच्या साथिदारांसोबत मिळून थेरगावात दादागिरी केली. एकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करुन मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी तीन वाजता तुळजाई कॉलनी, थेरगाव येथे घडली.

मयूर घोलप असे स्वयंघोषित भाईचे नाव आहे. त्याच्यासह शुभम चौधरी, आदित्य चव्हाण, अजय कांबळे, प्रणव शेवाळे, सोन्या साबळे व इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम चौधरी आणि आदित्य चव्हाण या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी शामसुंदर श्रीनाथ यादव (वय 52, रा. तुळजाई कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे रिक्षा चालक आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता ते त्यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी चार ते पाच दुचाकीवरून आरोपी आले. कोयता हवेत फिरवून यादव यांच्या कॉलनीमध्ये दहशत  यादव यांचा मुलगा अतुल यांच्याबाबत विचारपूस केल्याने यादव यांनी आरोपींना काय झाले असे विचारले.

त्यावेळी मयूर घोलप याने ‘मी मयूर घोलप आहे. पिंपरी चिंचवडचा भाई आहे. अतुल कुठे आहे. मी त्याला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून कोयत्याने यादव यांच्यावर वार केला. तो त्यांनी हुकवला. अन्य आरोपींनी यादव यांना लाकडी दांडके, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यादव यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ करून घराबाहेर ठेवलेल्या कुंड्यांची तोडफोड केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button