breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“अप्पा…काळीज जड होतंय;” गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त केलेली धनंजय मुंडेंची पोस्ट चर्चेत

मुंबई |

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. भाजपा नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यानिमित्ताने गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. ज्यांच्याशी संवाद साधता येईल, राज्याचं राजकारण समजेल आणि शिवसेना काय आहे हे माहिती असणारा एकही नेता आज भाजपात दिसत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. याच दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणारी पोस्ट चर्चेत आहे. “अप्पा… तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जयंती, पुण्यतिथी असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती असल्याचे जाणवते. ऊसतोड कामगार कल्याणाच्या तुमच्या शब्दाला मी पूर्ण करणार हा शब्द देतो. स्व. अप्पांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन…” असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील वडील गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. “लोकनेते मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त ‘संकल्प सेवेचा’, ‘सेवा यज्ञ’ उपक्रमांतर्गत ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासमवेत भाजी भाकरीचा आस्वाद घेतला. तसेच ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवारांचे कोविड लसीकरण करून घेतले,” असे त्यांनी ट्वीट करून सांगितले.

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनाला संघर्षदिन म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button