breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

बापरे! देव तारी त्याला कोण मारी; १०८ वर्षांचे आजोबा करोनामुक्त

  • कणखर मनशक्ती, बिनचूक उपचाराची फलश्रुती

कराड |

तब्बल १०८ वर्षीय आजोबांनी एचआरसीटीचा स्कोअर नऊ आणि शरीरातील प्राणवायूची घटलेली पातळी अशा क्लिष्ट परिस्थितीत करोना विरुद्धची लढाई जिंकली. काटक शरीर अन् प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अहिरेक (ता. खंडाळा) येथील दादासाहेब बापूराव धायगुडे यांनी ही किमया करून दाखवली. लोणंदच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमधून ते प्रकृती स्वास्थ्यासह घरीही परतलेत. करोनाच्या अधिक तीव्रतेच्या दुसऱ्या लाटेत लोकांची बेफिकीरी आणि यंत्रणा गोंधळल्याने रुग्णवाढ सतत झेपावत राहून करोनाबळींचे सत्र सुरूच राहिले. भय व चिंता वाढवणाऱ्या या परिस्थितीमुळे प्रचंड संख्येने करोना रुग्ण मनोबल हरवून प्राण गमवू लागल्याने ही महामारी महाभयानक बनली. अगदी तगडे तरुणही जिवास मुकल्याने समाजमन सैरभर झाले.

मात्र, कणखर मनशक्ती अन् सकारात्मक दृष्टिकोन असेल, तर अगदीच वयोवृद्ध असूनही करोनाला हरवले जाऊ शकते हेच दादासाहेब धायगुडे यांनी जणू सिद्ध करून दाखवले. हे १०८ वर्षीय आजोबा प्रकृती अस्वास्थ्यामुळे १८ मे रोजी लोणंदच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. प्राथमिक तपासणीत त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान होताना, त्यांचा ‘एचआरसीटी’ तपासणीतील दर हा नऊ असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. मकरंद डोंबाळे, डॉ. उमेश साळुंखे व त्यांच्या सहकारी पथकाने दादासाहेबांवर बिनचूक उपचार केले. त्यांना आयुर्वेदिक काढेही देण्यात आले. तर, वयोवृद्ध असूनही हा रुग्ण मानसिकदृष्टय़ा भक्कम राहिल्याने त्यांनी करोनावर खऱ्या अर्थाने विजय मिळवल्याचे उपचारकर्ते डॉक्टर सांगतात. या आजोबांचे नातू उत्कर्ष धायगुडे हेही डॉक्टर असून, त्यांनी डॉ. डोंबाळे, डॉ. साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पेढे देऊन आभार मानत आनंद व्यक्त केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button