breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला, प्रवाशांची सर्व माहिती लीक

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील विमानसेवा कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लिक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या डेट लिकमध्ये प्रवाशांच्या क्रेडिट कार्ड, पासपोर्टसह आणि इतर माहिती चोरीला गेली आहे.

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर येत आहे. एअर इंडियाने नुकताच या संदर्भात वेबसाईटवर माहिती दिली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सायबर हल्ल्यात अनेक प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरी झाली आहे. यात जवळपास 45 लाख प्रवाशांचा डेटा चोरी करण्यात आला आहे. यात देशासह परदेशातील प्रवाशांच्या माहितीचा समावेश आहे.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रवाशांचा डेटा लीक झाला आहे. यात जन्म तारीख, नाव, संपर्क, पासपोर्टची माहिती, तिकिटाची माहिती, पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधी माहितीचा समावेश आहे. आम्हाला डेटा प्रोसेसरकडून या संदर्भातील पहिली माहिती 25 फेब्रुवारी 2021 रोजी मिळाली होती. यानुसार 25 मार्च 2021 ते 5 एप्रिल 2021 पर्यंतचा आकडेवारीवर परिणाम दिसत आहे.

SITA PSS द्वारे डेटाची चोरी’
हा डेटा SITA PSS द्वारे चोरी झाला आहे. हा डेटा प्रोसेसर प्रवाशांच्या सेवेसाठी काम करतो. तसेच प्रवाशांचा डेटा साठवून ठेवण्याची आणि तो प्रोसेस करण्याची जबाबदारी त्यावर असते. डेटा लीक प्रकरणात कोणत्याही प्रवाशाच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाली आहे. मात्र यात CVV नंबरच्या डेटाची चोरी झालेली नाही. हा सर्व्हर हॅक झाल्यानंतर त्याची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे.

सायबर हल्ल्याची तातडीने चौकशी
या सायबर हल्ल्याची माहिती मिळताच आम्ही तातडीने चौकशी केली आहे. या हल्ल्यामुळे प्रभावित झालेले सर्व्हर सुरक्षित करण्यात आले आहे. त्याशिवाय विविध क्रेडिट कार्डधारकांशी याबाबत संपर्क साधला असून त्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच एअर इंडियाने एफएफपी प्रोग्रामसाठी वापरला जाणार पासवर्ड रिसेट केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button