breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

CSK vs KKR IPL 2021: चेन्नईचा कोलकता नाईट रायडर्सवर ३ विकेटने मात

अबुधाबी – ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस यांनी रचलेल्या पायाचा कळस रविंद्र जडेजाने चढवत चेन्नई सुपर किंग्जला शानदार विजय मिळून दिला. आयपीएलच्या १४व्या हंगामात रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा ३ विकेटनी पराभव केला. या विजयासह चेन्नईने प्ले ऑफमधील स्थान निश्चित केले. त्याच बरोबर गुणतक्त्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले. चेन्नईचे १० सामन्यातील ८ विजयसह १६ गुण झाले आहेत.

विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस यांनी शानदार सुरूवात करून दिली. या दोघांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती असो की जलद गोलंदाज ऋतुराजने सर्व गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या. ही जोडी शतकी भागिदारी करेल असे वाटत असताना आंद्रे रसेलने ऋतुराजला ४० धावांवर बाद केले. त्याने २८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ४० धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मोईन अलीने फाफसह धावांची गती कमी होऊ दिली नाही. या दोघांनी संघाचे शतक पूर्ण करून दिले.

१२व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने फाफला ४३ धावांवर बाद केले. फाफच्या जागी आलेला अंबाती रायडू १० धावांवर बाद झाला. १७व्या षटकात मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मोईन अली बाद झाला. त्याने २८ चेंडूत ३२ धावा केल्या. तर १८व्या षटकात रैना धावबाद झाला. तेव्हा चेन्नईला विजयासाठी १७ चेंडूत ३० धावांची गरज होती आणि मैदानात कर्णधार धोनीसह रविंद्र जडेजा मैदानात होते. वरुणने धोनीला बोल्ड केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button