breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

भंडारदऱ्यात जॉन-दिशाला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

अभिनेता जॉन अब्राहम  आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ Ek Villain Returns या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. भंडारदरा परिसरात या चित्रपटाची शूटिंग सुरू असून ही शूटिंग पाहण्यासाठी पर्यटक व स्थानिकांनी मोठी गर्दी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या टीमला शूटिंगसाठी परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न उपस्थित केला गेला. तर जलसंपदा अधिकारी अभिजीत देशमुख यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आल्याचं स्पष्ट केलं.

भंडारदरा परिसर हा पावसाळ्यात अधिकच विलोभनीय दिसतो. अभिजात निसर्ग सौंदर्याचं वरदान या परिसराला लाभलं आहे. भंडारदरा धरणाच्या दोनशे फूट उंचीवरील मोरीतून जेव्हा पाणी सोडलं जातं, तेव्हा याठिकाणी अत्यंत विलोभनीय धबधबा तयार होतो. हे दृश्य अंब्रेला फॉल म्हणून ओळखलं जातं. दोनशे फूट उंचीवरील मोरीच्या पुढे एक गोलाकार आकाराचा मोठा खडक आहे. वेगाने येणारे पाणी जेव्हा या खडकावरून खाली पडू लागले, तेव्हा ते उघडलेल्या छत्रीसारखे दिसते. म्हणूनच याला अंब्रेला फॉल म्हटलं जातं. याच ठिकाणी दिशा-जॉनच्या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. अंब्रेला फॉल हे हजारो पर्यटकांचं आकर्षण आहे.

जॉन अब्राहम आणि दिशा पटानीसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक मोहीत सुरीसुद्धा याठिकाणी उपस्थित होते. हे शूटिंग पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. या चित्रपटात तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दिशा आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांनी ‘मलंग’ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं.

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button