TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अंगारकी चतुर्थी निमित्त मोरया गोसावी मंदिरात भाविकांची गर्दी, विक्रेत्यांना बंदी

पिंपरी चिंचवड | अंगारकी चतुर्थीनिमित्त चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिरात गणेशभक्त दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. आज सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी उपस्थिती लावली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणारी मंदीरे खुली केल्यानंतर पहिल्याच अंगारकीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चेह-यावर उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, मंदिर परिसरात अनधिकृत विक्रेत्यांना बंदी घातली आहे.अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे. त्यामुळे चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शानासाठी उपस्थिती लावली आहे. मंदिर परिसरात फुल, हार, अगरबत्ती, नारळ तसेच पेढे विक्रेत्यांची रेलचेल दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वीभूमीवर खबरदारी म्हणून मंदिरात प्रवेशासाठी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत.

अंगारकी चतुर्थीला मोरया गोसावी मंदिर परिसरात मोठा यात्रा भरते, देशातील विविध भागातून विक्रेते आपली दुकाने या ठिकाणी मांडत असतात. परंतु, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मंदिर परिसरात अनधिकृत विक्रेत्यांना बसण्यासाठी मज्जाव केला आहे. याठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि अतिक्रमण विभागाची गाडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरगावावरून आलेल्या विक्रेत्यांना परतीचा मार्ग पत्करला आहे.

‘रस्ता व पदपथावर नागरिकांना रहदारीस व वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने मोरया गोसावी मंदिर परिसरात अनधिकृत पथविक्रेत्यांनी बसू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल,’ असा फलक पालिकेच्या वतीने मंदिर परिसरात लावण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button