पिंपरी / चिंचवड

लवकर उठून मुलाला शाळेत सोडायला न गेल्याने विवाहितेचा छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, सास-यावर गुन्हा

लवकर उठून मुलाला शाळेत सोडायला न गेल्याने विवाहितेचा छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, सास-यावर गुन्हा

पिंपरी l प्रतिनिधी

विवाहिता लवकर उठून मुलाला शाळेत सोडायला गेली नाही. तसेच स्कोर्पिओ कार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत, या कारणावरून सासू आणि सास-याने विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. ही घटना 28 मार्च 2016 नंतर दीड महिन्याने 12 एप्रिल 2022 या कालावधीत गणेशनगर, चिखली येथे घडली.

सासू कमल विलास करपे, सासरा विलास करपे (दोघे रा.अ गणेशनगर, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयात विवाहितेच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीला ‘तू लवकर उठली नाही व तू मुलगा देवांश याला शाळेत सोडायला गेली नाही. तसेच स्कोर्पिओ गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण’ असे म्हणत वारंवार शिवीगाळ व दमदाटी केली. संगनमत करून विवाहितेला मानसिक त्रास दिला. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. आरोपींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घरातील बेडरूमच्या छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button