breaking-newsक्रिडा

cricket world cup 2019 : ऑस्ट्रेलियाचे पारडे जड

लंडन : विश्वविजेतेपद टिकवण्यासाठी झगडणाऱ्या ऑस्ट्रेलियाने योग्य वेळी लय पकडली आहे, तर न्यूझीलंडला पाकिस्तानकडून पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळेच गुणतालिकेत अव्वल चौघांमध्ये असलेल्या या दोन प्रतिस्पध्र्यामधील शनिवारी होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे.

भारताकडून पराभव वगळल्यास ऑस्ट्रेलियाची विश्वचषकामधील कामगिरी ही वर्चस्वपूर्ण आहे. सात सामन्यांत सहा विजय मिळवून एकूण १२ गुणांसह उपांत्य फेरीत पात्र ठरणारा हा पहिला संघ ठरला आहे. आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ आपली विजयी घोडदौड लॉर्ड्सवर कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.

विश्वचषकामध्ये न्यूझीलंडचा संघ सलग सात सामन्यांत अपराजित राहिला होता. मात्र त्यांची ही मालिका पाकिस्तानने खंडित केली. या सामन्यांमध्ये त्यांनी आपल्या संघात कोणताही बदल केला नव्हता. आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (३ जुलै) यांच्याविरुद्धच्या दोन उर्वरित सामन्यांत एक विजय किंवा अनिकाली सामन्याचा गुण मिळाला तरी, तो न्यूझीलंडला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पुरेसा ठरेल.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या २०१५च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला नामोहरम केले होते. या दोन संघांमध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यांमध्येसुद्धा ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडपेक्षा ७-३ अशी सरस कामगिरी केली आहे. याचप्रमाणे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील इंग्लंडचा ६४ धावांनी पराभव केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. फिंच आणि वॉर्नर या दोघांच्या सातत्यपूर्ण कामगिरीला ऑस्ट्रेलियाच्या यशाचे श्रेय जाते.

स्टार्क-बेहरेंडॉर्फ डोकेदुखी ठरणार

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने १८.२६च्या सरासरीने १९ बळी मिळवत गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. स्विंग, वेग आणि उसळणारे चेंडू टाकणारा स्टार्क न्यूझीलंडच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकेल. जेसन बेहरेंडॉर्फने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेत त्याला छान साथ दिली आहे.

सामना क्र. ३७

न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया

* स्थळ : लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड, लंडन  ’सामन्याची वेळ : सायं. ६ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

विल्यम्सनवर भिस्त

न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार केन विल्यम्सनवर आहे. त्याने पाच डावांमध्ये ४१४ धावा केल्या आहेत. २०१७ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातसुद्धा त्याने शतक साकारले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत झालेल्या १२ एकदिवसीय सामन्यांत त्याने ४१.६च्या सरासरीने ४१६ धावा केल्या आहेत.

संघ

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेंड्रॉफ, अ‍ॅलेक्स केरी (उपकर्णधार व यष्टीरक्षक), नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी’ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फग्र्युसन, हेन्री निकोल्स.

आमनेसामने

एकदिवसीय    

सामने : १३६, ऑस्ट्रेलिया: ९०,

न्यूझीलंड : ३९, टाय / रद्द : ०/७

विश्वचषकात   

सामने : १०, ऑस्ट्रेलिया: ७,

न्यूझीलंड : ३, टाय / रद्द : ०/०

 

अव्वल फलंदाज

१. डेव्हिड वॉर्नर             ५००  धावा

२. आरोन फिंच              ४९६ धावा

३. शाकिब अल हसन     ४७६  धावा

अव्वल गोलंदाज

१. मिचेल स्टार्क           १९ बळी

२. जोफ्रा आर्चर            १६ बळी

३. मोहम्मद आमिर      १६ बळी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button