ताज्या घडामोडीमुंबई

तल्लफ महागणार! चहाचे दर वाढले, टी कॉफी असोसिएशनचा निर्णय

मुंबई |  पेट्रोल डिझेलच्या चढत्या दरामुळे मुंबईत वडापाव सात रुपयांनी महाग झाल्याची बातमी कालच आली होती. आज आणखी महत्वाचे पेय महाग झाले आहे. दर तासाला ज्याची तुफान तल्लफ येते अशी चहा महाग झाली असून सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी चटके बसणार आहेत. टी कॉफी असोसिएशनच्यावतीने राज्यात चहाचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता, दूध दरवाढीनंतर चहाचा दर वाढवण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात साखर, दूध, चहा पावडर यांचे दर वाढले आहेत. परिणामी चहाचे दरही वाढले.

साखर, दूध, चहापावडर यांचे भाव वाढल्याने चहाचे दरही वाढले आहेत. चहा विक्रेत्यांना आर्थिक गणित जमवणं अधिक कठीण होत होते. त्यानंतर चहा विक्रेत्यांची संघटना असलेल्या टी कॉफी असोसिएशनच्यावतीने चहाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साधारणपणे 10 रुपयांना मिळणारा कटिंग चहा आता 12 रुपयांना मिळणार आहे.

वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या वाढत्या किंमतीमुळे दूध उत्पादक महासंघ, कंपन्यांनी दूधाच्या दरात वाढ केली आहे. प्रति लिटर दूधामागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज, अमूल, मदर डेअरी आदींनी दूधाच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ केली आहे.

कॉफीच्या किंमती किती वाढल्या?

कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. Bru च्या किंमतीमध्ये तीन ते सात टक्केंनी वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत तीन ते चार टक्के वाढ झाली आहे. नेस्ले इंडियाच्या A+milk च्या एक लीटर वाल्या पाकिटाची किंमत चार टक्केंनी वाढली आहे. त्यामुळे या पाकिटाची किंमत 78 रुपये झाली आहे. याआधी हे पाकिट 75 रुपयांना मिळत होते. नेस्कॅफे क्लासिकच्या 25 ग्रॅम वाल्या पाकिटाची किंमत 2.5 टक्केंनी वाढून 80 रुपयांना झाली आहे. याची किंमत आधी 78 रुपये होती. नेस्कॅफे क्लासिक 50 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत 145 रुपयांवरुन 150 रुपये झाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button