breaking-newsताज्या घडामोडी
#COVID19: शेतातला गहू गरजुंना वाटला; नाशिकच्या बळीराजाचा आदर्श
नाशिक । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
नाशिक येथील एका शेतकऱ्यांने कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना मदत व्हावी म्हणून चक्क आपल्या एक एकर शेतातील गहू गरजू लोकांना शेतातच वाटला आहे. दत्ता राम पाटील असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे.
दत्ता पाटील म्हणाले की, “मी एक छोटा शेतकरी आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही पण आमच्याकडे एक भाकरी असल्यास त्यातील अर्धी भाकरी गरजूला देवू शकतो.