breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत कोविड लसीकरण केंद्र सुरू, नगरसेविका आशा शेंडगे यांचा पाठपुरावा

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिकांसाठी दापोडी येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नगरसेविका आशा शेंडगे यांनी पाठपुरावा केला असून पालिका प्रशासनाने त्यांची मागणी विचारात घेऊन याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली.

फुगेवाडी, दापोडी याठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना तीन ते चार कि. मी. अंतर कापून कासारवाडी किंवा सांगवी याठिकाणी लसीकरणासाठी जावे लागायचे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे नगरसेविका आशा शेंडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी कोविड लसीकरण सेंटर सुरू करण्याची मागणी केली.

मागणी मान्य करून आयुक्त पाटील यांनी या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली. गणेश इंग्लिश मीडिअम स्कुल येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दापोडीतील नागरिकांची सोय झाली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन नगरसेविका शेंडगे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button