breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Covid-19: चिंताजनक! पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात तब्बल १ हजार पॉझिटिव्ह रूग्ण

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शहरात आज दिवसभरात तब्बल १ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे. दरम्यान आज दिवसभरात २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज दिवसभरात १००० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठ्या रुग्ण वाढीमुळे आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ३१३५ इतकी झाली आहे. यातील ३२६ रूग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २८०९ रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button