breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ७३ दिवसात पहिल्यांदा आठ लाखांच्या खाली

नवी दिल्ली |

देशात करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. देशातल्या नवबाधितांची, मृतांची संख्या हेच सांगतेय. अद्यापही करोनाचा धोका कायम असला तरीही कमी होणारी संख्या ही आशादायी बाब आहे. गेल्या ७३ दिवसांत प्रथमच काल दिवसभरातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आठ लाखांच्या खाली आली आहे.

  • नव्या बाधितांची संख्या

देशात गेल्या २४ तासात ६२ हजार ४८० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ९८ हजार ६५६ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत ही संख्या कायम आठ लाखांच्या वरच होती. मात्र, गेल्या ७३ दिवसांत पहिल्यांदाच या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे.

  • करोनामुक्त आणि मृतांची आकडेवारी

तर काल दिवसभरात ८८हजार ९७७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या आता दोन कोटी ८५ लाख ८० हजार ७४७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात देशातल्या १ हजार ५८७ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांची एकूण संख्या आता तीन लाख ८३ हजार ४९० वर पोहोचली आहे.

  • लसीकरण

देशात गेल्या २४ तासात ३२ लाख ५९ हजार ३ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी पहिला डोस २८ लाख ५४ हजार २२० नागरिकांनी घेतला. तर चार लाख ४ हजार ७८३ जणांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button