breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

#Covid-19: सलाम पिंपरी-चिंचवडकर: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भाजपा एकवटली!

  •  महापालिकेतील सत्ताधारी भाजपामधील गट-तटाला तिलांजली
  •  विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत पदाधिकाऱ्याची बैठक

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी एकवटले आहेत. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडकरांनो घाबरु नका…दोन दिवसांत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिले आहे. शहरातील कोविड-१९ महामारी नियंत्रणात आणण्यासाठी आणि ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अभिषेक बारणे, तुषार हिंगे यांच्यासह महापालिका आयुक्त राजेश पाटील उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पदाधिकाऱ्यांच्या एकजूटीचे कौतुक केली असून, ‘सलाम पिंपरी-चिंचवडकर’ अशी साद घातली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड हा आपला अभिमान आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. त्यामुळे आता आपण समाजाचे- लोकांचे देणे लागतो. या भावनेतून सर्वांनी राजकीय मतभेद विसरुन लोकांच्या मदतीला धावून जावूया, असे आवाहन केले होते.

आमदार जगताप यांचीही जोरदार बॅटिंग…
भाजपाचे दिग्गज नेते आमदार लक्ष्मण जगताप यांनीही कोरोना काळात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार निधीतील २५ लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी द्यावी, अशी यशस्वी मागणी जगाताप यांनी केली. याच धर्तीवर राज्यातील सर्व आमदारांना असा निधी खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गोरगरीब लोकांना वाऱ्यावर सोडणार का? असा सवाल उपस्थित करीत महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व रुग्णालयांमध्ये लागू करण्याची मागणी केली. तसेच, खासगी रुग्णवाहिका चालकांच्या मनमानीला चाप लावण्याची मागणीही जगताप यांनी केली. पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे ‘कारभारी’ असलेले आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांच्या जोडीला या कोरोनाच्या संकटात जुन्या गटातील पदाधिकाऱ्यांचीही साथ मिळत आहे.

नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांमध्ये सर्व ऑक्सिजन यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट करावे. प्रशासनाने महापालिका आणि खासगी रुग्णालयांना तशा सूचना कराव्यात. ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत.
– महेश किसन लांडगे, आमदार भोसरी विधानसभा.
शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड.

वाचा- आमदार महेश लांडगे यांचा दणका: पिंपरी-चिंचवडला मिळाला पहाटे ऑक्सिजन पुरवठा!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button