breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

#Covid-19: मुंबईसह राज्यभरात करोनाच्या नव्या रुग्णांची वाढ, तीन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गुरुवारी ४,२५५ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले आहे. यात मुंबईतील २,३६६ नव्या बाधितांचा समावेश आहे. राज्यात दिवसभरात तीन करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर एकूण २० हजार ६३४ करोनाबाधित रुग्ण उपचाराधीन आहेत.

दिवसभरात राज्यात २,८७९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ५५ हजार १८४ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८७ टक्के आहे. नागपूरच्या भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थातच निरीच्या ताज्या अहवालानुसार बीए ५ या विषाणू उपप्रकाराचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण २९ वर्षांचा पुरुष असून, दुसरा रुग्ण ५४ वर्षांची महिला आहे. त्यांनी मागील आठवड्यात अनुक्रमे केरळ आणि मुंबईत प्रवास केला आहे. या दोघांचेही लसीकरण झालेले असून, हे दोघे रुग्ण घरगुती विलिगीकरणात बरे झाले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ बाधित रुग्णांची संख्या १९ झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत गुरुवारी २,३६६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. यामुळे मुंबईतील आजपर्यंतची करोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ८७ हजार ३२६ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत दोन आणि रायगडमध्ये एक अशी एकूण तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.

जिल्ह्यात ९३४ रुग्णांची वाढ

ठाणे : जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ गुरुवारीही कायम होती. दिवसभरात जिल्ह्यात नवीन ९३४ रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात सर्वाधिक ३६१ रुग्ण नवी मुंबई शहरात आढळले आहेत. तर ठाण्यात ३५८ रुग्ण आढळले असून कल्याण-डोंबिवली ८२, मिरा-भाईंदर ७४, ठाणे ग्रामीण ४३, बदलापूर ११, भिवंडी ३, उल्हासनगरमध्ये २ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या ७ लाख १७ हजार ९० रुग्णांपैकी ७ लाख १७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ११ हजार ८९६ बाधित रुग्ण दगावले आहेत. सध्या जिल्ह्यात ३ हजार ७५३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button