breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: करोना संकटात देशाच्या मदतीसाठी भारतीय हवाई दलाचं उड्डाण

मुंबई |

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सध्या चिंताजनक परिस्थिती असून अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यांकडून केंद्राकडे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वारंवार मागणी केली जात आहे. संकटाच्या या काळात भारतीय हवाई दलाने केंद्राच्या मदतीला धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिजन कंटेनर्स, सिलेंडर्स, महत्वाची औषधं, साहित्य आणि करोनाशी लढण्यासाठी सरकारला मदत करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट केलं जात आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचं (डीआरडीओ) रुग्णालय उभं करण्यासाठी आम्ही कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि बंगळुरुतून डॉक्टर आणि परिचारिकांना एफरलिफ्ट केलं. तसंच दिल्लीमधील करोना केंद्रांसाठी बंगळुरु येथून डीआरडीओचे ऑक्स्जिन कंटेनर्स एअरलिफ्ट करण्यात आले. भारतीय हवाई दलाने ट्विट करत म्हटलं आहे की, “करोनाविरोधातील लढाईत वेगाने वाहतूक करत भारतीय हवाई दल मदत करत करत आहे. वैद्यकीय कर्मचारी, महत्वाची सामुग्री आणि औषधं देशभरातील करोना रुग्णालयं आणि सुविधांमध्ये पोहोचवण्याचं काम सुरु आहे”.

वाचा- #Covid-19: धक्कादायक! भारतात तीन लाखांहून अधिक रुग्ण; जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button