breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

#Covid-19: पालघर जिल्ह्यात रेमडेसिविरचा अपुरा पुरवठा

  • १३४२ रुग्णांकरिता फक्त ६५४ इंजेक्शन

पालघर |

पालघर जिल्ह्यातील ३३ करोना समर्पित रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने ६५४ इंजेक्शनचा साठा रुग्ण संख्येच्या आधारावर वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेल्या इंजेक्शनचा पुरवठा खूपच तुटपुंजा असून शासकीय करोना समर्पित रुग्णालयातील या इंजेक्शनचा पुरवठादेखील संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.पालघर जिल्ह्याात ३३ खासगी समर्पित करोना रुग्णालयांमध्ये सुमारे १२०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. त्यापैकी पालघर तालुक्यातील दोन रुग्णालय सोमवारपासून कार्यरत झाली असून उर्वरित रुग्णालयांमध्ये दाखल ११०० रुग्णांच्या प्रमाणात ४१४ रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. यापैकी काही रुग्णालयांनी थेट उत्पादकांकडून इंजेक्शन साठा मिळवल्याचे निदर्शनास आल्याने अशा काही रुग्णालयांना या वितरण प्रणालीमधून वगळण्यात आले होते. दरम्यान सोमवारी सायंकाळी २४० रेमडेसिविर इंजेक्शन साठा सन फार्मा कंपनीकडून उपलब्ध झाला आहे.

राज्य सरकारने १२ एप्रिल रोजी राज्यभरातील उपचाराधिन करोना रुग्णांचा आढावा घेऊन त्यापैकी गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासाठी सूत्र ठरविण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्याच्या तुलनेत पालघर जिल्ह्यााला सुमारे दीड टक्का म्हणजेच सव्वासहाशे ते साडेसहाशे इंजेक्शनचा दररोज पुरवठा करण्याचे अपेक्षित होते. या इंजेक्शनच्या पुरवठ्यातील पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून अन्न व औषध प्रशासनालयाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याचे वितरण आदेशानुसार वाटप करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. रुग्णालयाला त्यांच्याकडे दाखल रुग्णांची माहिती गूगल शीटद्वारे मागविण्यात आली होती व त्या अनुषंगाने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र तसेच पालघर, डहाणू व विक्रमगड येथील खासगी करोना मान्यताप्राप्त रुग्णालयांना रेमडेसिविरचे वितरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्याात उपचाराधिन असलेल्या रुग्णांच्या सुमारे दहा टक्के रुग्णांना गंभीर असल्यास रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करावा अशा आशयाच्या सूचना रुग्णालयाला देण्यात आला असून प्राणवायूच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी देखरेख समिती कार्यरत करण्यात आली आहे.

वाचा- #Covid-19: फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांचा Covid-19 च्या संसर्गाने मृत्यू

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button