breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#Covid-19: बँकॉकमध्ये घरातही करोना निर्बंध; एकत्र जेवण्यास बंदी

बँकॉक |

थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून आता तेथे घरातसुद्धा जास्त लोक एकत्र जमून जेवण्यावर बंदी घातली आहे. वीसहून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे निर्बंध यात घालण्यात आले आहेत. बांधकाम सुरू असलेली ठिकाणे बंद करण्यास सांगण्यात आले असून बँकॉक व इतर नऊ प्रांतात कामगारांच्या वसाहती बंद करण्यात आल्या आहेत. हे निर्बंध तीस दिवस लागू राहणार आहेत. थायलंडमध्ये ३९९५ रुग्ण सापडले असून २४ तासात ४२ बळी गेले आहेत. अलीकडेच रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून स्थलांतरित कामगार सहकार्य करीत नसलेल्या बांधकामांच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.

स्थलांतरित कामगारांच्या वसाहती बंद करण्यात आल्या असल्याचे कोविड १९ परिस्थिती हाताळणाऱ्या केंद्राचे प्रवक्ते अपिसामाई श्रीरंगसन यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या,की सांकुत साखो प्रांतात रुग्णांची संख्या जास्त आहे. हे ठिकाण बँकॉकच्या दक्षिणेला आहे. राजधानी क्षेत्रात त्याचा समावेश नाही. बँकॉक मध्ये गंभीर रुग्णांना ठेवण्यासाठीच्या खाटा अपुऱ्या पडत असून काही तात्पुरती रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. पंतप्रधान प्रयुथ चॅन ओचा यांनी सांगितले,की सात दिवसांची संचारबंदी बँकॉकमध्ये लागू करण्याचा प्रस्ताव तूर्त मान्य करण्यात आलेला नाही. नवीन निर्बंधानुसार  बांधकाम कामगारांना वेगळे काढले जाणार आहे. ही कारवाई बँकॉक व इतर पाच प्रांतात केली जाणार असून दक्षिणेकडील चार राज्यात विषाणूचे प्रमाण जास्त असल्याने तेथे ही कारवाई केली जाणार आहे. बँकॉकमध्ये सर्व व्यवहार सकाळी नऊ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. मद्य विक्री सुरू राहणार असून त्यासाठी केवळ पार्सल सेवा दिली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button