breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: औषध महानियंत्रकांची ‘स्पुटनिक व्ही’ला मंजुरी

  • करोनाप्रतिबंधासाठी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर तिसरी लस

नवी दिल्ली |

रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी मंगळवारी तज्ज्ञ समितीच्या शिफारशी तपासून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता करोना विरोधातील  लढय़ात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या लशीनंतर तिसऱ्या लशीची भर पडली आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व  नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्ड—अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती .  ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.

गेल्या शुक्रवारी भारतीय औषध महानियंत्रकांनी ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने केलेल्या चाचण्यांची माहिती मागवली होती. या लशीच्या सुरक्षितता व परिणामकारकतेची तपासणी प्रत्यक्षात फेब्रुवारीतच सुरू झाली आहे. औषध महानियंत्रकांच्या विषय तज्ज्ञ समितीने कंपनीला ‘स्पुटनिक ५’ या लशीच्या भारतातील चाचण्यांच्या आधारे शेवटच्या टप्प्यातील परिणामकारकता व सुरक्षितता या बाबतची माहितीही मागवली होती. ऑक्टोबपर्यंत भारतात पाच उत्पादकांकडून लशी उपलब्ध होणार आहेत. ऑक्टोबपर्यंत स्पुटनिक व्ही (रेड्डीज लॅबोरेटरी), जॉन्सन अँड जॉन्सन (बायॉलॉजिकल इ), नोव्हाव्हॅक्स ( सीरम इंडिया), झायडस कॅडिला (झायकोव्ह डी), भारत बायोटेकची नाकावाटे देण्याची लस एवढय़ा पाच लशी उपलब्ध होणार आहेत. जगात सध्या करोना प्रतिबंधक वीस लशी वैद्यकीय चाचण्यांच्या पातळ्यांवर आहेत. भारतात स्पुटनिक व्ही लशीच्या चाचण्या १८ ते ९९  वयोगटातील १६०० लोकांवर चालू आहेत. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने पॅनाशिया बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, ग्लँड फार्मा या भारतीय कंपन्यांशी स्पुटनिक व्ही लशीच्या उत्पादनाचा करार केला आहे.

वाचा- बारावी नापास बनला एमबीबीएस डॉक्टर; शिरुरमध्ये ‘देवमाणूस’चा पर्दाफाश

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button