breaking-newsपिंपरी / चिंचवड

COVID 19 : पुण्यातील कोरोनाबाधीत महिलेचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे, शिवाजीनगर येथील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आज (बुधवारी) मृत्यू झाला. यामुळे शहरातील तीन आणि शहराबाहेरील तीन अशा सहा जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

पुणे, शिवाजीनगर भागातील महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेवर पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु होते. या महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. दरम्यान, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि 24 एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा आणि 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा सहा जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button