ताज्या घडामोडीमुंबई

सेल्फ टेस्टिंगची लपवाछपवी पडणार महागात; मुंबई मनपाची नवी नियमावली जारी

मुंबई | घरगुती चाचण्या किंवा रॅपिड अन्टीजेन संच उत्पादक, विक्रेते यांना संचाच्या विक्रीबाबत तपशील पालिकेला देणे आता बंधनकारक असणार आहे. महापालिकेने संचाच्या वापराबाबतची नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत घरगुती किंवा रॅपिड अन्टीजेन चाचण्यांचा वापर वाढला असून याचे अहवाल वापरणांऱ्यामार्फत संबंधित यंत्रणेला दिले जात नाहीत. त्यामुळे आता वापरकर्त्यांचा पाठपुरावा करणारी यंत्रणा पालिकेने सुरू केली आहे.

कोरोनाच्या स्फोटक वाढीने मुंबईला लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते, त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर येत, काही कठोर निर्णय घेत आहे. अनेकजण सध्या सेल्फ टेस्ट किटचा वापर करत आहेत, मात्र याबाबत पालिकेला माहिती देणे बंधनकारक असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणीनी सांगितले आहे.

दरम्यान, सेल्फ टेस्ट किटचा वापर करणाऱ्यांनी त्यांचा अहवाल अपलोड करणे आवश्यक आहे. रूग्णाचा पाठपुरावा करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. या किटचे वितरण करणाऱ्यांनी विक्रेत्यांना किती किट दिली आहेत, याची माहिती आम्हाला देणं बंधनकारक केलंय. त्याच बरोबर मेडिकलवाल्यांनी कुणाला विकले असतील त्यांची संपूर्ण माहिती आम्हाला द्यावी लागेल. रोज संध्याकाळी ६ वाजता ही माहिती मेल करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. वॉर्डनिहाय याची विभागणी करून वॉर्डरूम मार्फत या व्यक्तींशी संपर्क साधला जाईल. असेही काकाणी म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट आल्याने लहान मुलांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रातही लहान मुलांचे लसीकरण सुरू झाले. लहान मुलांच्या लसीकरणासाठी पूर्वी कमी सेंटर होते, आता सेंटर्स वाढवले आहेत. यामुळे लसीकरणाची संख्या वाढून २० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. येत्या काही दिवसांत १०० टक्के लसीकरणाचे ध्येय साध्य होईल, असेही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button