breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

धावत्या बाईकवर जोडप्याचे अश्लील चाळे; कारवाईची मागणी (VIDEO)

औरंगाबाद |

नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. शहरामधून जालन्याला जाणाऱ्या रस्त्यावरील रात्रीच्या वेळेस शूट करण्यात आलेला एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये धावत्या मोटरसायकलवर एक तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करताना दिसत आहेत. दुचाकी वेगाने धावत असताना तरुणी गाडीच्या पेट्रोल टँकवर चालकाकडे तोंड करुन बसलेली या व्हिडीओत दिसत आहे. गाडीवरील तरुण तरुणी एकमेकांचे चुंबन घेताना व्हिडीओत दिसतंय. हा व्हिडीओ या दुचाकीच्या बाजूने जाणाऱ्या एका गाडीमधून शूट करण्यात आलाय.

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार हा सर्व प्रकार औरंगाबाद शहरामधील आहे. व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा असून यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. विशेष म्हणजेच हा सर्व प्रकार औरंगाबादमध्ये अपघातांसाठी आणि सतत वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर घडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ असताना, अनेक गाड्या आजूबाजूने जात असताना हे दोघे धावत्या दुचाकीवर समोरासमोर बसून एकमेकांचं चुंबन घेत होते. दुचाकीवरील हे दोघे नक्की कोण आहेत, यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रेमाच्या नावाखाली हे तरुण तरुणी स्वत:सोबतच रस्त्यावर चालणाऱ्या अनेकांचा जीव धोक्यात घालत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय. हा मुर्खपणा असून या दोघांवर कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी काहींनी सोशल नेटवर्किंगवरुन केली आहे.

हे प्रकरण नक्की काय आहे, सोशल मीडियावरील दाव्यानुसार खरोखरच औरंगाबादमध्ये हा प्रकार घडला असेल तर त्याचा तपास केला जाणार का?, दोषींवर कारवाई केली जाणार का?, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button