breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

आणखी तीन मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड करणार – किरीट सोमय्या

नवी दिल्ली : आतापर्यंत २६ गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत. अकरा भ्रष्टाचारांची टीम तयार केली. त्यातही तीन राखीव खेळाडू आणखी वाढले. आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या आणखी तीन मंत्र्यांचे गैरव्यवहार लवकरच उघड करणार आहे. त्यातील एकाची फाइल मला आज दिल्लीत मिळाली आहे, असे स्पष्ट करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची चौकशी सुरू झाली आहे, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या यांनी अर्थराज्यमंत्री भागवत कराड, अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील तक्रारीसंदर्भात आज विविध अधिकाऱ्यांची आपण भेट घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू झाल्याचे सांगत लवकरच कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार हे अलिबाबा चाळीस चोरासारखे आहे.

या सरकारमधील आणखी तिघांचा भ्रष्टाचार आपण उघड करणार असून, त्यांना सत्तेतून जावे लागेल, असा दावा सोमय्या यांनी केला. नव्याने उघड करणार असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात विदर्भातील कॉंग्रेसचे मंत्री, एक शिवसेनेचे मंत्री आणि एकजण राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक जण आहेत. उद्धव ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला, त्यावेळी शिवसेनेचे लोक म्हणतात की नारायण राणे यांचाही अनधिकृत बंगला आहे. मला म्हणायचेही की त्यांचे काही अनधिकृत असेल, तर सरकार तुमचे आहे. दरम्यान, सोमय्या यांच्याविरूद्ध सामाजिक संस्था अर्थचे संस्थापक प्रवीण कलमे यांनी बदनामीचे दोन फौजदारी खटले दाखल केले आहेत.

मला कितीही नोटिसा पाठवा, माझ्याकडून शंभर कोटींची वसुली या सरकारला करता येणार नाही. पण भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये पाठविल्याशिवाय मी शांत बसणार नाही.

– किरीट सोमय्या, भाजप नेते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button