breaking-newsराष्ट्रिय

#Coronolockdown:सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरु करण्याचा विचार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात सार्वजिनक वाहतूक सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. राज्यांच्या विनंतीवरून कामगारांसाठी रेल्वेकडून देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक विशेष गाड्या चालवण्यात येत आहे. भविष्यकाळात केंद्र सरकार अटी व शर्थींसह सार्वजिनक वाहतूक सुविधा सुरू करण्याच्या विचारात असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने 17 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. नितीन गडकरी यांनी बस आणि कार ऑपरेशन कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊनमुळे बस आणि कार चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु त्यांचे प्रश्न सोडविण्यासठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी या वेळी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button