breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Coronavirus: ‘स्पेशल कॅटेगिरी’च्या पाटीसह पाच वर्षांच्या मुलाचा विमान प्रवास, तीन महिन्यांनी भेटला आईला

गळ्यात स्पेशल कॅटेगिरीची पाटी अडकवून पाच वर्षांच्या एका मुलाने विमान प्रवास केला. आजपासून देशांतर्गत विमान प्रवासाला संमती देण्यात आली आहे. त्यामुळेच एका विवान नावाच्या एका मुलाने एकट्याने दिल्ली ते बंगळुरू विमान प्रवास केला. विवान शर्मा हा पाच वर्षांचा मुलगा तीन महिने त्याच्या आजी आजोबांकडे म्हणजेच दिल्लीत गेला होता. त्याला आज तीन महिन्यांनी जेव्हा विमान प्रवासाला संमती मिळाली तेव्हा आईजवळ परतता आलं. दिल्लीहून स्पेशल कॅटेगरीची पाटी गळ्यात घालून या मुलाने विमान प्रवास केला. बंगळुरु विमानतळावर त्याची आई त्याला घ्यायला आली होती. तीन महिन्यांनी भेटलेल्या पाच वर्षांच्या मुलाला मिठी मारावी असं या आईला वाटत होतं पण ती ते करु शकली नाही.सगळे नियम पाळून त्याला बंगळुरू विमानतळावरुन त्याच्या घरी नेण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button