breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus | सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूने अखेर शिरकाव केलाय. सोलापुरात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. शहरातील पाच्छा पेठ परिसरातील एका रुग्णास 10 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 तारखेला या रुग्णाचा मृत्यू झाला. या 56 वर्षीय रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असताना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोरोना असल्याचे अहवालसमोर आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने सोलापूरकर बिनधास्त होते. मात्र, यापुढे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे अहवाल घेऊन तपासणी करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहेत. तर रुग्ण राहत असलेला संपूर्ण परिसर आता सील करण्यात आलेला आहे. रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली त्याच्या संपर्कात कोण कोण आलं आहे याबाबत माहिती घेतली जात आहे. शेजारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये रोज कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, सोलापूर जिल्हा मधोमध सुरक्षित होता. आता इथही कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन सावध झाले आहे.

मृत व्यक्तीची संपूर्ण इतिहास काढला जात आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा रुग्ण सापडल्याने आता सोलापूर जिल्हा ग्रीन झोनमधून बाहेर पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button