breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: वुहानची ‘ती’ प्रयोगशाळा इंटेलिजन्सच्या रडारवर, नोव्हेंबरमध्ये नेमकं काय घडलं?

चीनच्या वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतून करोना व्हायरस बाहेर आला अशी जगभरात चर्चा आहे. वुहानची ‘ती’ प्रयोगशाळा आता इंटेलिजन्स एजन्सींच्या रडारवर असून तिथे नेमकं काय काम चालायचं, नोव्हेंबरमध्ये नेमकं काय घडलं त्यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. फॉक्स न्यूजने हे वृत्त दिलं आहे.

शुक्रवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने ट्रम्प यांना यासंबंधी प्रश्न विचारला. वुहानच्या प्रयोगशाळेतून करोना व्हायरस बाहेर आला असे म्हटले जाते, त्याची चौकशी होणार का? त्यावर ट्रम्प यांनी “आम्ही त्या दिशेने तपास करत आहोत, अनेकजण त्या अंगाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व काही सुसंगत असल्यासारखं वाटत आहे” असे उत्तर दिले.

जगभरात करोना व्हायरसमुळे दीड लाखापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे अमेरिकेत मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. “ते एका विशिष्ट प्रकारच्या वटवाघुळाबद्दल बोलत आहेत. पण वटवाघुळाचे वास्तव्य त्या भागामध्ये नाही. वटवाघुळ तिथून ४० मैल दूर होते” असा दावा ट्रम्प यांनी केला.

वुहानमधल्या त्या प्रयोगशाळेची अमेरिकेने सखोल चौकशी सुरु केली आहे असे वृत्त फॉक्स न्यूजने दिले आहे. इंटेलिजन्स एजन्सीचे हेर वुहानमधल्या त्या प्रयोगशाळेबद्दल माहिती गोळा करत आहेत असे या वृत्तामध्ये म्हटले आहे. “बऱ्याच विचित्र गोष्टी घडत आहे. पण त्याचा तपास सुरु असून आम्ही शोधून काढू” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button