breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या 11 जणांवर पनवेलमध्ये गुन्हा दाखल
देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच जमावबंदीचेही आदेश दिलेले आहेत. हे आदेश मोडीत काढत पनवेल शहरात वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.