breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: लॉकडाउन काळात पती आंघोळ करत नाही, शरीरसुखासाठी जबरदस्ती करतोय !

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. या काळात लोकांनी जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सिंग पाळावं असं आवाहन सरकारी यंत्रणा करत आहेत. मात्र या कालखंडात अनेक घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी पोलिसांसमोर येत आहेत. बंगळुरुत एका महिलेने आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लॉकडाउन काळात आपला पती आंघोळ करत नाही, आणि वारंवार शरीरसुखाची मागणी करतो अशी तक्रार महिलेने बंगळुरु पोलिसांच्या ‘परिहार’ या विशेष हेल्पलाईनवर दिली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेचा पती हा बंगळुरुत दुकान चालवतो. मात्र सध्याच्या काळात पैसे नसल्यामुळे आपल्या पतीने दुकान उघडलेलं नाही. तसेच २४ मार्चपासून आपल्या पतीने आंघोळच केलेली नाही, पतीला स्वच्छतेचं महत्व समजावून सांगितलं तरीही तो आपलं ऐकत नसल्याचं महिलेने सांगितलं. याशिवाय पती वारंवार आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत असतो व सहकार्य न केल्यास आपल्याला मारहाणही करत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांकडे पाहून ९ वर्षीय मुलीनेही आंघोळ करणं बंद केलेलं आहे. पोलिसांनी ही तक्रार समुपदेशकाकडे सोपवली असून, सध्या या प्रकरणात पती आणि मुलीला सध्याच्या काळात स्वच्छतेचं महत्व किती आहे याची माहिती देणं सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button