breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: राज्यातील २४ तासांतील कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांक

टाळेबंदीच्या तिसरा टप्पा रविवारी संपणार असताना बुधवारी राज्यात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत करोनाचे १,४९५ रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण रुग्णसंख्या २५,९२२ वर पोहोचली आहे. राज्यात बुधवारी करोनाने ५४ जणांचा बळी घेतला. त्यात मुंबईतील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबादमध्ये २, वसई- विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला. राज्यातील एकूण मृतांची संख्या ९७५ झाली आहे. राज्यभरात बुधवारी ४२२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात ५,५४७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button