breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: रत्नागिरीत एकजण करोनाचा रूग्ण पॉझिटिव्ह

दुबईतून आल्याने लागण झाली

रत्नागिरी ।

दुबई येथून आल्यानंतर करोना रोगाचा संशयित म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीला करोना रोगाची लागण झाली आहे.

गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील ही सुमारे पन्नास वर्षे वयाची व्यक्ती काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल झाली होती. तिच्या खोकला व घशातील  द्रावाची चाचणी सकारात्मक आल्यामुळे करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रयोगशाळेच्या अहवालाने यावर शिक्कामोर्तब झाले  असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.

दरम्यान जिल्ह्यातील या पहिल्या रूग्णामुळे आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा आणखी  सतर्क  झाली असून रात्री उशिरा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपत्कालीन बैठक घेतली.  शहर व जिल्ह्यात आवश्यक  उपायोजना तात्काळ करून नागरिक सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा संख्येने येणार नाहीत, याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आदेश सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button