breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: महाराष्ट्र पोलिस दलात 511 नवे कोरोना बाधित रुग्ण; 7 पोलिसांचा मृत्यू

मुंबई: नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असलेल्या पोलिसांवरील भार कोविड-19 (Covid-19) संकटात अधिक वाढलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांभोवतीही कोरोनाचा तीव्र वेढा बसला आहे. मागील 24 तासांत 511 पोलिस कोरोना बाधित आढळून आलेले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे पोलिस दलातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16,912 झालेला आहे. त्यापैकी 3,020 अॅक्टीव्ह रुग्ण असून 13,719 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. कोरोना संसर्गामुळे एकूण 173 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत.

कोवि़ड-19 लॉकडाऊन काळात पोलिसांवरील ताण अधिक वाढलेला होता. जीवावर उदार होत कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना बाधित पोलिसांना योग्य सेवा-सुविधा मिळाव्यात याकडे गृहखात्याचे लक्ष होते. दरम्यान कोरोनावर मात करुन पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या पोलिसांचे जंगी स्वागतही करण्यात आलेले आहे. लॉकडाऊन काळात केलेल्या कामाचा आढावा दर्शवणारी डॉक्युमेंटरीही तयार करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button