breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात ३४९३ नवे कोरोना बाधित, १२७ मृत्यू, संख्येने ओलांडला १ लाखाचा टप्पा

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३४९३ करोना बाधित आढळले आहेत. तसेच १२७ मृत्यूंची नोंद झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झालेली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के इतका आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १७१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४७ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला राज्यात ४६ हजार ६१६ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्या राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. मागील २४ तासांमध्ये १२७ करोना रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये ९२ पुरुष तर ३५ महिला होत्या. आज नोंदवण्यात आलेल्या १२७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ६७ रुग्ण होते. तर ५२ रुग्णांचे वय हे ४० ते ५९ या वयोगटातील होते. ४० वर्षांखालील ८ रुग्ण होते. १२७ पैकी ८९ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग असे जोखमीचे आजार होते. कोविड १९ मुळे राज्यात मृत्यूंची ३७१७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या मृ्त्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांमधले आहेत. तर उर्वरीत मृत्यू २० मे ते ९ जून या कालावधीतले आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ६ लाख २४ हाजर ९७७ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button