breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रात आत्तापर्यंत ८१९ पोलिसांना कोरोनाची लागण, सात जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर सात पोलिसांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन आत्तापर्यंत चार कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात आत्तापर्यंत ८१९ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.