breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ८६८ वर
महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ८६८ झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात एकूण १२० रुग्ण सापडले असून सात मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमधील चार, वसई, नवी मुंबई आणि अंबरनाथमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ५६ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठण्यात आलेलं आहे.