breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय तसेच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर टनेल लावण्यात आले आहे.

रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, रुग्णांच्या घशातील चिकटा घेण्यासाठी डॉक्टर यांच्याकरिता swab बूथ बसविण्यात आले आहे. रुग्ण आणि डॉक्टर, नर्स यांच्यात सुरक्षित अंतर रहावे, यासाठी प्लास्टिक आच्छादन असलेले बेड रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहे.

महापौर माई उर्फ उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वायसीएम रुग्णालयात जावून संपूर्ण माहिती घेतली. रुग्णांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची पाहणी केली. यावेळी डॉ. वाबळे यांच्याशी चर्चा करून रुग्णालयाची स्वच्छता आणि रुग्णांची जेवणाची, राहण्याची गैरसोय होऊ नये, यासंदर्भात आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button