breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: भारतातील प्रत्यार्पणाविरोधात मल्याचा लंडनमधील सर्वोच्च न्यायालयात अर्ज

आपल्या प्रत्यार्पणाला आव्हान देणारे मद्यसम्राट विजय मल्या याचं अपील ब्रिटनच्या उच्च न्यायालयानं फेटाळून लावले होते. यामुळे ९ हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा आणि मनी लाँडिरग प्रकरणात मल्या याला मायदेशी आणण्याच्या भारताच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याचं चिन्ह निर्माण झालं होतं. परंतु आता त्यानं आपल्या भारतातील प्रत्यार्पणाविरोधात सोमवारी लंडनमधील सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी लंडनमधील उच्च न्यायालयानं मल्याची याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाकडून ऑर्डर आल्यानंतर त्याच्याकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची परवानगी घेण्यासाठी दोन आठवड्यांचा कालवधी होता. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत २० एप्रिल रोजी मिळाली होती.

न्यायालयाने मल्याचे अपील फेटाळल्यामुळे, भारतीय न्यायालयांपुढे आरोपांना सामोरे जाण्याकरता मल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. मल्या यानं अपील न केल्यास २८ दिवसांच्या आत भारतात प्रत्यार्पित करण्यासाठी भारत-ब्रिटन प्रत्यार्पण करारान्वये मंत्रालय न्यायालयाचा आदेश औपचारिकरीत्या प्रमाणित करणे अपेक्षित होते.

हे सत्याचा विपर्यास आणि कारस्थान या दोहोंचे सकृद्दर्शनी प्रकरण असल्याचा निर्णय आम्ही दिला आहे. अशा प्रकारे, हे मनी लाँडिरगचेही सकृद्दर्शनी प्रकरण आहे, असे हायकोर्टातील स्टीफन आयर्विन व एलिझाबेथ लैंग यांच्या पीठाने सांगितलं होत. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांनी मल्याविरुद्ध सुरू केलेल्या प्रकरणाचा हा मोठा निर्णायक टप्पा ठरला आहे. एप्रिल २०१७ मध्ये प्रत्यार्पण वॉरंटवर अटक करण्यात आल्यापासून मल्या हा जामिनावर ब्रिटनमध्ये आहे. मल्याला प्रत्यार्पित करण्याचा आदेश लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने डिसेंबर २०१८ मध्ये दिला होता आणि नंतर ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जाविद यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्यावर स्वाक्षरी केली होती. या आदेशाला मल्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button